Thursday, September 3, 2009

यातल काही वाटल तर बदला ,,किवा,,,? विसरून जा .....


आपल्या काळात ...@
आपल्या काळात इमारतिंची ऊँची वाढली,,,,
पण,
मानुस्किची कमी झाली.
रस्ते रुंद झाले,,,
पण,
दृष्टी अरुंद झाली.
खर्च वाढला ,,
आणि,
शिल्लक कमी झाली.
घर मोठी,,,, 
पण,
कुटुंब छोटी झाली.
सुखसोई पुष्कल,,,
पण,
वेळ दुर्मिल झाला .
पदव्या स्वस्त ,,
आणि,
शाहनपण महाग झाले.
माहितीचे डोंगर जमले.,,,
पण,
नेमकेपनाचे झरे आटले.
तद्न्य वाढले ,,,
आणि ,
समस्या ही .
ओषधे भरपूर,,
पण,
आरोग्य कमी झाले.
मालकीची भाषा वाढली,,
आन ,
मुल्यांची कमी झाली.
आपण बोलतो फार ...
प्रेम क्वचित करतो ..
आन,
तिरस्कार सहज करतो.
राहनिमान  उन्चावल,,
पण,
जगन दल्भद्रि झाल.
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली,,
पण ,
वर्षात जगण्याची नाही.
आपण भले चंद्रावर गेलो,,,
पण,
शेजारच्या मित्राला भेटन जमत नाही.
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत,,
पण,
आतल्या हर्न्याच काय?
हवा शुध्ह करण्यासाठी आटापिटा, 
पण,
आत्म्याच्या गुदमरण्याचे काय?
आवक आपली वाढली...
पण,
नियत कमी झाली.
संख्या वाढली ,गुणवत्ता कमी झाली.
हा काळ उंच माणसांचा ,
पण,
खुज्या व्यक्तिमत्वाचा .
उदंड फायद्याचा ,उथल नात्यांचा.
जागतिक शांतीच्या गप्पांचा,
आन, घरातल्या युध्हांचा.
मोकला वेळ हाताशी,
पण,
त्यातली गमत गेलेली.
विविध खाद्य प्रकारांचा ,
पण,
सत्व हरवलेला.
दोन मिलवती,
पण,
त्यांचे घटस्पोट वाढलेले.
घर नटलेली,
पण,
घरकुल दुभंगलेली.
दीवानखाण्याच्या खिडकित खुप काही मांडलेले.
पण,
कोठिची खोली रिकामी.
हे पत्र ,
तुमच्या पर्यंत पोह्चवानर तंत्रद्यान आज आहें.
आणि आजच आहें तुमच स्वातंत्र्य ही ...
या यंत्राकडे लक्ष देण्याचे 
किवा न देण्याचे ,,
यातल काही वाटल तर बदला ,,किवा,,,?
विसरून जा .....दलाई लामा 
         अनुवाद-शोभा भागवत  

1 COMMENTS:

Grenadier said...
kuthe bhetla ha lekh chan aahe vastu stiti sangta.. kharacha aajcha vishvat sadan aahet pan prem nai mansa aahet pan manuski nahi... aaj aaj aaj...

No comments: