Sunday, September 6, 2009

सुखाची तहान भागवता भागवता ...

सुखामागे...
सुखामागे धावताना ...२
विवेक पडतो गहाण..अन्
पाण्यात राहूनही माशाची भागत नाही तहान,,,
सत्त्यात आणता आणता,
दमछाक होते खुप,अन् 
वाटी वाटी न ओतल तरी कमी पडत तुप....
बायका आणि पोरानसाठी,
चले म्हणे हा खेल.
पैसा आणून ओतेन म्हणतो,,,पण
मगु नका वेळ....२
करियर होते जीवन मात्र,
पण जगायच जमेना तंत्र,,
बापाची ओलख मूल सांगतात,
पैसा छापायच यन्त्र,,,
चुकून सुट्टी घेतली तरी 
स्वताच पहुना घरच्या घरी,,
दोन दिवस कौतुक होते,
नंतर डोकेदुखीच सारी...2 
मग मुलच विचरू लागतात ,
बाबा अजुन कहो घरी?
त्यांचा ही दोष नसतो,
त्याना सवयच नसते मुळी,,,
क्षणिक औदासिन्य येते पुन्हा ,,,,
सुरु होते करियर चक्र ,
करियर चे दलन दलता स्वस्थ्य होते वक्र,,,२
सोनेरी वेली वाढत जातात ,
घराभोवती आतून मात्र मातीच्या भिंती 
कधी ही न सारवलेल्या...
आयुष्याच्या संध्याकाली मग ,,,
जाणवत धावण्याच्या हट्टापायी ,
कधी श्वासच घेतला नाही....
सगळ काही पाहता पाहता ...
आरशात पाहनच राहून गेल ...अन् 
सुखाची तहान भागवता भागवता ,
समाधान दुर्रररररर...वाहून गेल.