आयुष्य नक्की काय असतं ?
हासर्या फ़ुलावरचं दव असतं..
नाचर्या मुलाचं नाच असतं..
दुखर्या ह्रुदयाचा घाव असतं..
आयुष्य नक्की काय असतं,
समुद्रात चाललेलं दिशाहिनं जहाजं असतं,
किनारा शोधत फ़िरायच असत,
वादळांनी डगमगुन जायचं नसतं.
आयुष्य नक्की काय असत?
ते एक तलम रेशमी वस्त्र असत..
ज्याचे त्यानेच ते विणायच असत
पण अति ताणायच नसत..
आयुष्य नक्की काय असत?
सतत गुन्तत जाणारे ते एक कोडे असत
ते ज्याचे त्यानेच सोडवायच असत
गुन्तून मात्र त्यात पडायच नसत
Wednesday, October 21, 2009
मनमोकळं गाण
मनमोकळं गाण
.
.
.
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं !
सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत ?
डोळे उघडून पहा तरी :
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत !
हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं !
आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा !
झुळझुळणार्या झर्याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या !
इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
----------- मंगेश पाडगांवकर
Subscribe to:
Posts (Atom)