Monday, February 1, 2010

आपुलकीचा कट्टा .....लाइम लाइट

आपुलकीचा कट्टा .....लाइम लाइट 
परवाच एक सुंदर सिनेमा बघण्यात आला
"लाइम लाइट",,,चार्ली चा एक अत्यंत सुंदर सिनेमा,
त्यात त्याने रंग भूमिवरील झगमगटा पासून दूर फेकल्या गेलेल्या नटाची
भूमिका केली आहें त्या चर्लिला कुणी विचारित नाही तरी हा बाबा  रोज जिथे नाटकाच्या 
तालिमी चालल्या असतील तिथे हा रोज जावून उभा रहात असे.
त्याच्या कड़े इतर लोकांच लक्ष गेल्यावर सहाजिकच ते सारे हा कशाला आला इथे कडमड़ायला
असा एकंदर सुर असे आणि मग यथेच्छ धुलाइ आणि मानहानी ही ठरलेलीच
इतक सार सहन करून ही तो पुन्हा दुसर्या दिवशी मार खायला तिथे हजर असे .
पण तिथे एक त्याच्या वर प्रेम करणारी त्याच्यावर माया असणारी हीरोइन असते 
तिला हे सार सहन होत नसे आणि एक दिवस ती त्याला रागावून बोलते अरे ,,
"कुठल्या मातीचा बनला आहें तु तुला राग येत नाही 
हे लोक तुझ दुस्वास करतात शिवीगाळ करतात तुला राग येत नाही घृणा नाही येत ?"
त्यावर चार्ली म्हणतो ,येते ना 
"मला त्या रस्त्यावर पडलेल्या सांडलेल्या रक्ताची ही घृणा येते"
पण काय करू ? माझ्या नासनासत तेच वाहते आहेना?
त्याचा राग राग करून कसे चालेल?
मला वाटत,
जागतिकी करनाच्या जमान्यात सीमा धूसर होत आहेत.
जग जवळ येते दुसर्यांशी जुळवुन घेताना आपण मात्र 
आपापल्या मनसां पासून दुरावातोय 
प्रत्येक जन एक वेगल विश्व निर्माण करू पाहतोय त्यात,,,
नेमक आपल्याच लोकाना तो नाकारतोय,
त्यासाठी जर आपण सर्वानी आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून 
थोडा विचार करायची गरज आहें मग बघा ,,
आपल्या असंख्य कुरबुरिंची तक्रारींची घृणा येणार नाही राग येणार नाही
अर्थातच आपुलकीचा कट्टा मजबूत होइल यात शंका नाही

No comments: