२०१० साठीचे संकल्प... कारणांसहित...
माझे २०१० साठीचे संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा ? म्हणुन त्याची कारणं पण देत आहे.
संकल्प १. - सारेगमपाचं कुठलंही पर्व बघणार नाही.
कारण -
अ. - पल्लवी जोशी - आपण तिच्या घरी आरतीला बसल्यासारखं ती टाळ्या वाजवायला लावते. एकदा गीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग संगीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग गायक .... मग वादक.... मग प्रेक्षक..... मग श्रोते...... मग मान्यवर..... मग ती स्वत:..... असं नुसत्या टाळ्याच टाळ्या.... ! बर नुसत्या टाळ्या नाही तर जोरदार टाळ्या. वाट्टेल ते मॅचिंग करुन, वाट्टेल त्या गाण्याला, वाट्टेल त्या शब्दांनी, तिला ओ का ठो कळत नसताना, मळमळेल इतकं कौतुक करते. अगदी कुणी ढेकर जरी दिला तरी, "काय अप्रतिम ढेकर दिलास आणि माझ्या खुप आवडीच्या ढेकरांपैकी एक ढेकर दिलास म्हणुन तुझे विशेष आभार.... " काय बोलयचं ह्यावर.... ?

ब. - अवधुत गुप्ते तिचा मोठा भाऊ - "अरे... अरे... अरे... काय भन्नाट, सुसाट, अचाट गायलास... मित्रा..... कानाचे पडदे पार फाडलेस बघ... अरे काय साजुक खाऊन नाजुक गळ्यातुन चाबुक ढेकर दिलास गड्या.... एक नम्बर.. माझ्या एकातरी गाण्यात हि हार्मनी वापरणार बघ मी.....
क. बाळासाहेब मंगेशकर - (खयाल गायकी, शोभा गुर्टु, तंबो-याचा तारा, स्वातंत्र्यपुर्व काळ, ज्ञानेश्वर महाराज, आकाशवाणी अशा विविध विषयांवर बोलल्यानंतर सुमारे पावणे दोन तासांनी...) "...१९६३ मध्ये लताच्या रेकॉरडींगच्या वेळेस गाणं गाताना तिला असाच विलंबीत ढेकर आला होता. त्यावेळेस मी तिच्याकडुन वरचा ढ लावुन घेतला आणि..... ............................................................
..............................
.......................... ...........................असो
संकल्प २. - बायकोशी कधीही भांडणार नाही.
कारण - ह्याची सुमारे ६७ कारणं देऊ शकेन पण तुर्तास.....
अ. - ती तिच्या चुका मान्य करत नाही.
ब. - जीभेला हाड नसतं, हे ती सिद्ध करते.
क. - परवा तिनी तिचे सगळे दोष मान्य केले पण पुढे म्हणाली की, " माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलय. जर हे दोष नसते तर कुणीतरी बरा नसता का मिळाला आणि एकदा जरा आरशात........
.............................अ
संकल्प ३. - खोटं बोलणार नाही.
(हे जरा अशक्य कोटीतलं होतय का ? बर मग ... खोटं बोलुन ऑफीसला दांडी मारणार नाही.)
कारण -
अ. - हयात व्यक्तींना मारल्यानी ब्रह्महत्येचं पाप लागतं.
ब. - ह्या दांडीची नोटीस देता येत नाही त्यामुळे सुट्टीची खातरी नसते. ती मिळालीच तर पकडले जाण्याची भिती दिवसभर वाटत राहते. सुट्टीचा आनंद मिळत नाही.
क. - नेमकं बॉसच्या हातुन पण त्याच दिवशी ब्रह्महत्येचं पातक घडले असल्यास तो तिथं थेटरात भेटण्याची दाट शक्यता असते. ..आणि दुःख विसरायला आलोय हे कारण त्याला पटत नाही. त्याचं तिथं येण्याचं कारण सांगायची त्याला गरज नसते.
ड. - खरच ती हयात व्यक्ती कधी गचकली तर जाणं अवघड होतं आणि मग नविन हयात व्यक्तीच्या हत्येचं पाप....
.............................अ
संकल्प ४. - दारु पिणार नाही.
कारण -
अ. - तोल जातो.
ब. - पैसे जातात
क. - चव जाते.
ड. - शुद्ध जाते.
ई. - दृष्टी जाते.
फ. - मजा जाते.
ग. - इज्जत जाते.
संकल्प . - कितीही ओळखीची वाटली तरी समोरची बाई जोपर्यंत ओळख देत नाही, तोपर्यंत मी बघुन हसणार नाही.
कारण -
अ. - तिच्याकडुन डाव्या गालावर...
ब. - संधीसाधु समाजाकडुन सर्वांगावर....
संकल्प ७. - पुण्यातल्या पीएमटी बसमध्ये पाऊल टाकणार नाही. (बसमध्ये बसणार नाही, असे लिहले नाहीये कारण आजपर्यंत मला कधीच बसायला मिळाले नाहीये.)
कारण -
अ. - उरलेले सुट्टे पैसे, चपला आणि सगळी हाडं परत मिळत नाही.
ब. - हव्या त्या स्टॉपवर उतरता येत नाही.
No comments:
Post a Comment