एक दिवस बघा गम्मत झाली ,
आमच्या गावात पक्की सड़क आली...
आणि आमचा तात्या
नियमित तालुक्याला बजारला जावू लागला ...
आधी बी त्यों जात व्हता बजारला ,
त्याच पक्क्या सड़केहुन
एक दिवस आमच्या गावात "एसटी "आली,
आणि मग,
तात्याच्या तालुक्याला फेर्या वाढल्या ...
यच फेर्यांबरोबर गावात आमच्या
गावा बाहेरच वार आल.
वार्या बरोबर पैसा आला ...
त्याच पैशाचे पंख तात्याला लागले.
आणि मग ,
त्या पंखानी तो,
स्वप्नात उडू लागला,
बंगल्यात राहु लागला ,
हळूच एक दिवस ,
मग आमच्या गावात त्याच ,
सड़केवरन राजकारण ही आल ,
आणि शेती सोडून
राजकारनात भरपूर पैसा हे आमच्या ,
तात्याला कलु लागल...
स्वप्नातल प्रत्यक्षात दिसू लागल
जागेपणी भास होवू लागले..
त्याच घरातल ,
शेतीतल, शेताच्या बांधावरच ,
उसाकड़च ,सार सार लक्ष उडाल.
आणि ते राजकारना कड वलु लागल...
त्याच सडकेहुन त्याच्या
घरी गाड़ी आली टिव्ही आला ..
आणि तात्याच सार वेळा पत्रक बिघडल..
आता सुध्हा तात्या रोज ,,,,
तालुक्याला,,,,,
जातो,,,,
पण डॉक्टर कड़े ...
नेमांन "सुया" टोचतो,,,
"दंडात आणि मनात " ....
कारण,,,,
शेती बरोबर मुलांकडे ही त्याच आता लक्ष नसत
गणित सार आयुष्याच असच फसत असत...
हो,
मात्र टिव्ही बघत राजकारना मात्र बोलत असतो,
आणि,,
न चुकता कधी निसर्गाच्या ,,,
तर कधी सरकारच्या नावन "बोंबा" मारत असतो...
ही कविता तशी प्रातिनिधिक,
तात्या बदलून त्या जागी स्वतहाला ही ठेवू शकतो.
2 comments:
beaytifull
dhnyawad
jaishri ram
Post a Comment