Sunday, September 6, 2009

सुखाची तहान भागवता भागवता ...

सुखामागे...
सुखामागे धावताना ...२
विवेक पडतो गहाण..अन्
पाण्यात राहूनही माशाची भागत नाही तहान,,,
सत्त्यात आणता आणता,
दमछाक होते खुप,अन् 
वाटी वाटी न ओतल तरी कमी पडत तुप....
बायका आणि पोरानसाठी,
चले म्हणे हा खेल.
पैसा आणून ओतेन म्हणतो,,,पण
मगु नका वेळ....२
करियर होते जीवन मात्र,
पण जगायच जमेना तंत्र,,
बापाची ओलख मूल सांगतात,
पैसा छापायच यन्त्र,,,
चुकून सुट्टी घेतली तरी 
स्वताच पहुना घरच्या घरी,,
दोन दिवस कौतुक होते,
नंतर डोकेदुखीच सारी...2 
मग मुलच विचरू लागतात ,
बाबा अजुन कहो घरी?
त्यांचा ही दोष नसतो,
त्याना सवयच नसते मुळी,,,
क्षणिक औदासिन्य येते पुन्हा ,,,,
सुरु होते करियर चक्र ,
करियर चे दलन दलता स्वस्थ्य होते वक्र,,,२
सोनेरी वेली वाढत जातात ,
घराभोवती आतून मात्र मातीच्या भिंती 
कधी ही न सारवलेल्या...
आयुष्याच्या संध्याकाली मग ,,,
जाणवत धावण्याच्या हट्टापायी ,
कधी श्वासच घेतला नाही....
सगळ काही पाहता पाहता ...
आरशात पाहनच राहून गेल ...अन् 
सुखाची तहान भागवता भागवता ,
समाधान दुर्रररररर...वाहून गेल.  
 

Friday, September 4, 2009

चीडत का नाही इथली माणसे ?

चीडत का नाही इथली माणसे ?
कढत का नाहीत इथली माणसे ? 
थंड प्रेता सारखी वस्ति दिसे ,
उठत का नाही इथली माणसे?
कोंडलेला धुर न बाहेर येइ,
जळत का नाही इथली माणसे?
मध्यरात्री, क्षीण कंकाली फूटे ,
रडत का नाही इथली माणसे?
दानडग्यांची थाप येइ दारावरी,
धजत का नाही इथली माणसे?
दहशतीच्या सर्व येथे खुणा,
भिड़त का नाही इथली माणसे ?
कविवर्य ;-मंगेश पाडगावकर     
    

Thursday, September 3, 2009

गुटखा खानार्यनसाठी ...

गुटखा खानार्यनसाठी ....
खुश खबर! खुश खबर!! खुश खबर!!!
गुटखा खा..बक्षिस मिळवा.
गुटका खाण्याची स्पर्धा ...
प्रथम पारितोषिक~~~~~मृत्यु
द्वितीय पारितोषिक~~~~~~कर्करोग
तृतीय पारितोषिक~~~~~~नपुसंकत्व
चतुर्थ पारितोषिक~~~~~~गलालेले  गाल
पाचवे पारितोषिक~~~~~~लहान तोंड
सहावे पारितोषिक~~~~~~तारुन्यात  म्हातारपण
सातवे पारितोषिक~~~~~~किडनी ख़राब
आठवे पारितोषिक~~~~~~खोक्ल्यात वाढ
नववे पारितोषिक~~~~~~~कफ 
दहावे पारितोषिक~~~~~~~दात गायब
प्रायोजक ;-यमदूत मित्रा मंडल(कालावधि;-आज पासून मरेपर्यंत )
फोर्म मिलन्याचे ठिकाण;- पण स्टाल,रेलवे स्टेशन ,बस स्टैंड.
 फोर्म फी ;-५०पैसे,१.५०रूपया, ५ रुपये,पुडी प्रमाने.
बक्षिस वितरण स्थल;-स्मशान भूमि
प्रमुख पाहुणे;- मा.श्री . यमराज 
टिप;-प्रत्येक गुट्ख्या सोबत "दुर्बल्त्व मोफत"
आयोजक; -सुनील भूमकर c\o  यमदूत मित्रा मंडल.

सुविचार......

सुविचार
- पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)
- दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.
- त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
- युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
- जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!
- जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
- लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
- आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
- सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
- माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
- दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुस-याला प्रजलीत करते.
- आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
- सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
- उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
- जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
- संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
- ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
- शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
- कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
- मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
- अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
- चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
- काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
- कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
- उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
- कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
- पवित्र असावे पण पतित होऊ नये.
- त्याग करावा पण ताठा नसावा.
- स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
- आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
- स्वतंत्र असावे पण स्वै नसावे.
- घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
- माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
- सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर...परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
- मानवी संबंध धावणा-या आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.
- श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
- ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते

प्रामाणिक माणूस....

प्रामाणिक माणूस.
एकदा एका कारखान्याच्या अध्यक्षांनी आपल्या सर्व अधिकार्‍यांची वार्षिक
बैठक बोलावली.
अध्यक्षांनी बैठक संपवताना घोषणा केली कि थोड्या वेळाने सर्वांना एक
मातीची कुंडी, एका पिशवीत माती व काही बियाणे देण्यात येतील.
जो कुणी पुढच्या वर्षी वार्षिक बैठकीत सर्वात चांगले झाड दाखवेल त्याचा
त्या बैठकीत सत्कार करण्यात येईल.
सर्व अधिकार्‍यांनी घरी गेल्यावर ते बियाणे दिलेल्या मातीतच पेरले. वर्ष
उलटले व परत वार्षिक बैठकीची वेळ आली.
बैठकीचा हॉल विविध प्रकारांच्या सुंदर झाडानी भरुन गेला. काही झाडांना तर
फुलेही आली होती.
पण या सर्वात एक अधिकारी हिरमुसलेला पडल्या चेहर्‍याने दिलेली कुंडी व
माती तशिच घेऊन एका कोपर्‍यात बसुन होता.
सर्वांची झाडे बघितल्यावर अध्यक्षांनी मंचावर जावून माईक हाती घेतला व
भाषण आटोपतांना त्या हिरमुसलेल्या अधिकार्‍याला बक्षिस जाहिर केलं.
सर्व थक्क झाले.
त्याने तर फक्त कुंडी व माती तशिच आणली होती.
सत्कार झाल्यावर अध्यक्ष बोलले," तुम्हा सर्वात हा एकच प्रामाणिक माणूस
आहे. तुम्हाला देण्यात आलेले बियाणे पाण्यात उकळण्यात आले होते. त्यामुळे
त्यातुन झाडे लागणे अशक्य होते !!!

खटला !

खटला !
त्याने कंटाळून, अतिशय रागाने आपल्या बायकोला मगरींच्या तलावात फेकले.
.
.
.
.
आणि
.
.
.
.
पशु मित्रांनी त्याच्यावर मगरिंचा छळ केल्याचा खटला लावला.

साम्य......


साम्य.
राजकारणी आणि अतिरेकी या दोघांत काय साम्य आहे ?\
.
.
.
.
.
.
दोघांसोबत सुरक्षा रक्षक असतात.
.
.
राजकारण्यां सोबत सुरक्षा रक्षक असतात कारण यांच्यापासुन लोकांच रक्षण करायला.
अतिरेक्यांसोबत सुरक्षा रक्षक असतात यांना लोकांपासुन वाचवायला, लोक
यांना जीवंत ठेवणार नाहीत.