Tuesday, October 20, 2009

काही मानस ..आयुष्यभर

काही मानस ..आयुष्यभर 
काही मानस मैत्रीत आपल्या खानद्यावर हात टाकतात
नी बेसावध क्षणी आपल्याला स्वताहाचा खांदाच देवून टाकतात !
काही मानस..
वरन हापूस आम्ब्यासारखी दिसतात 
चवीन त्याचा स्वाद घ्यावा तर,,
नेमकी बाठिला लागलेली असतात..
काही  मानस..
वरन सुकलेल्या चिखला सारखी दिसतात 
जमीन कड़क म्हणून पाय टाकावा तर ,,
आपल्याला  आणखीच आत खेचतात ..
काही मानस ...
पिम्पलाच्या पाना सारखी असतात 
त्यांची  जाळी झाली तरी 
मनाच्या पुस्तकात जपविशी वाटतात 
आयुष्यभर....


कणा ......


कणा ......

ओलखलत का सर मला ?
पावसात आला कुणी ?
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी..
क्षणभर बसला नंतर हसला ,
बोलला वरती पाहून ..
"गंगामाइ पाहुनी आली गेली घरट्यात राहून 
माहेरवशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली 
मोकळ्या हाती जाइल कशी?
बायको मात्र वाचली ..
भिंत खचली 
चुल विझली 
होते नव्हते गेले ..
प्रसाद म्हणून पापन्यावरती पाणी तेव्हडे ठेवले 
कारभारणिला घेवून संगे ,,
सर आता लढतो आहें 
पडकी भिंत बांधतो आहें,
चिखल गाळ काढतो आहें 
खिशाकडे  हात जाताच,,,?
हसत हसत उठला ,,
"पैसे नको सर मला ..जरा एकटेपना वाटला 
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा
फक्त  लढ म्हणा 
कुसुमाग्रज ..वि.वा.शिरवाडकर 

करुणेचा कलाम....बाबा आमटे

करुणेचा कलाम....बाबा आमटे 
मी श्रीमंती मागितली ,,,,
सुखी होता याव म्हणुन .
मला दारिद्र्य मीलाल ,,,
मी शहाणा व्हाव म्हणुन .
मी सामर्थ्य मगितल ,,,
माझा जयजयकार व्हावा म्हणुन.
दुबला झालो परमेश्वराची आठवण यावी म्हणुन ,,,
मी सार काही मागुन घेतल ,,
आयुष्य भोगता याव म्हणुन .
मला आयुष्य मीलाल ,,?
पण सार ,,भोगाव म्हणुन 
मात्र ,,
मगितल ते कधीच मीलाल नाही .
मिलनर मिलाल्यावाचुन राहिल नाही .
मुक्या प्रार्थनाना होकार आले.
अन् दुःखच माझ्या सुखाचे साक्षीदार झाले